अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे.
परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी केली.
पारनेर विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व सुदाम पवार त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यामध्ये बेल्हे राळेगण थेरपाळ हा रस्ता केंद्रीय परिवहन रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे आ. निलेश लंके यांनी आमदार झाल्यानंतर बेल्हे ते शिरूर, राळेगण थेरपाळमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761 हा घोषित झाला असून
या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठविला होता त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले असून,
त्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761 असल्याच्या आशयाची अधिसूचना भारत सरकारच्या सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाकडून दि 06 फेब्रुवारी 2018 रोजी निर्गमित झालेली आहे.
बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा 39 किलोमिटरचा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी हजारे यांच्यासह खासदार कोल्हे व अमदार लंके यांनी पाठपुरावा केला आहे. या कामाचे विनाकारण इतरांनी श्रेय घेऊ नये असेही तरटे म्हणाले.
या वेळी तरटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची काही कागदपत्रेही पत्रकार परीषेदेत दाखविली.
या रस्त्याचा पाठपुरावा पुणे जिल्हा परीषदेचे जिल्हा परीषद सदस्य पांडूरंग पवार यांनी केला होता. त्याच बरोबर हा रस्ता राष्ट्रीय माहामार्ग व्हावा यासाठी हाजारे व तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी प्रयत्न केले होते असेही तरटे म्हणाले.
त्यानंतर बेल्हे राळेगण थेरपाळ ते शिरूर या राष्ट्रीय महामार्गासाठी निधी मिळावा याचा पाठपुरावा आमदार लंके यांनी आमदार झाल्यानंतर केला होता त्यासाठी त्यांनी गडकरी यांची भेटही घेतली होती.
गडकरी यांनीही लवकरच त्याही कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द लंके यांना दिला असल्याचेही तरटे यांनी यावेळी पत्रकार परीषदेत सांगीतले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved