सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सणासुदीचे दिवस येऊ लागले आहे, यातच शहरात लुटमारी, चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत.

मात्र वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. नुकतीच शहरातील एका चोरीच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे.

घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील ४६ हजार रुपये किंमतीचे सोने – चांदीचे दागिने चोरीला गेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिरयदा दाखल करण्यात आली होती.

फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरीचा तपास लावत दोन महिलांकडून ते दागिणे हस्तगत करून संबंधीत महिलेला परत दिले.

६ सट्टेंबर रोजी पद्मानगरच्या शिवतेज चौकात राहत असलेल्या कविता सुनील जाधव (वय- ३१) यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरातील ४६ हजार रूपये किंमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे चोरून नेले होते.

याप्रकरणी जाधव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस पथकाने या चोरीचा शोध घेत किर्ती रोहीत गायकवाड (वय- २५ रा, तपोवन रोड, नगर) व पुनम रूपेश झोगडे (वय- २१ रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांना अटक केली.

त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्या- चांदीचे दागिणे हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या हस्ते कविता जाधव यांना सदरचे दागिणे परत देण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe