अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हयातील अनेक अवैध गुटका विक्रेत्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत लाखोंचा माल जप्त केला आहे.
याच कारवाया पुढे चालू ठेवत नुकतेच पोलिसांनी डिझेलची अवैध वाहतूक करणारे दोन टॅकर ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारे दोन टॅकर पकडले असून,
एकूण 13 लाख 45 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपी गौतम वसंत बेळगे (वय 37 रा. भगवानबाबा चौक भिंगार अहमदनगर)
हा दि.26 ऑक्टोबर रोजी 5.30 वाजण्याच्या सुमारास जीपीओ चौकाजवळील छावणी कॉम्प्लेक्स मधील कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुकानाचे पाठीमागील बाजूस सुलभ शौचालय समोर 13 लाख,45 हजार 275 रुपये किमतीचा माल टॅकर,
ट्रक असे असलेले वाहनांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा टॅकरमधून ट्रकमध्ये डिझेल टाकून व बेकायदा ट्रक व टॅकरमध्ये बेकायदेशीरपणे साठा स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळवून आला.
याप्रकरणी विशेष पोलिस पथकातील पोना अरविंद रमेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक डॉ दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनि प्रविण पाटील हे करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved