कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही.
कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला.

हे केवळ २०१४ ला केलेल्या चुकीमुळे झाले असून २०१४ ला केलेली चूक पुन्हा करून नका, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते. कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे चासनळी, धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
आशुतोष काळे म्हणाले, चासनळी परिसरातील धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांमध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणी यांचे प्रश्न मार्गी लावून
या परिसरातील शेतकऱ्यांना आपला माल लासलगाव, बसवंत पिंपळगाव आदी ठिकाणी घेऊन जाता यावा यासाठी चासनळी येथे मोठा पूल बांधला. त्यामुळे या परिसरात दळणवळण वाढलेले आहे.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख