अहमदनगर ;- भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. देशातील युवकांना नोकर्या तर मिळाल्या नसून, आहे त्या नोकर्या देखील धोक्यात आल्या आहेत. शाश्वत विकासाचा पर्याय राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवकांना दिसत आहे.
अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राष्ट्रवादीत नेहमीच न्याय व सन्मान देण्याचे काम करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे मा.शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या शहर उपाध्यक्षपदी ताज खान यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रा. विधाते बोलत होते.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, अजीम राजे, अत्तार खान, फईम इनामदार, अन्सार शेख, अन्वर शेख, वाहिद शेख, बब्बू तांबोली, नदिम शेख, वसिम खान, तन्वीर खान, साहिल खान, शानूर खान, रईस वस्ताद, रिजवान शेख, अयान शेख, रेहान शेख, अश्पाक शेख, अरबाज शेख, शहेबाज सय्यद, मकसूद खान आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार यांनी सर्व समाजातील युवकांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली जात आहे. पुरोगामी विचाराने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काम आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात चालू आहे.
अल्पसंख्यांक समाजाला न्याय व नेतृत्व देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अल्पसंख्यांक विभागचे शहर उपाध्यक्ष ताज खान यांनी पक्षाची ध्येय-धोरणे जनसामान्यांपर्यंन्त पोहचवून संघटन मजबुत करण्याचे काम करणार आहे.
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहणार असून, पदाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजातीलप्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल आ.अरुणकाका जगताप, आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खान यांचे अभिनंदन केले.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार