अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या दिवसात जोरदार व्हायरल होत आहे.
याबाबतची पडताळणी करण्यात आली असून या मेसेजबाबतची सत्यता जाणून घेऊ .. केंद्र सरकारकडून सर्व महिलांच्या खात्यामध्ये ‘पंतप्रधान नारी शक्ती योजने’अंतर्गत 2 लाख 20 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात येत आहेत.
जर असा कोणताही मेसेज तुम्हाला मिळाला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. तुम्ही अशा मेसेजपासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
PIB फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर आले – केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे ट्वीट शेअर केले आहे.
PIB चे असे म्हणणे आहे की,जर तुमच्याकडे कोणताही व्हायरल मेसेज आला आणि त्यामध्ये कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याचे सांगण्यात आले तर तसे अजिबात करू नका.सर्वात आधी त्या मेसेजची विश्वासार्हता तपासून घ्या
आणि त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही एखाद्या बनावट मेसेज किंवा लिंकवर क्लिक केल्यास ऑनलाइन फ्रॉड होऊन तुमची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे.
PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते.
सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved