दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला.

तर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणार्‍या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष तालेवर गोहेर, विजय छजलानी,

आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, राहुल लखन, अ‍ॅड.सिध्दार्थ सोलंकी, नरेंद्र तांबोली, मनोज बिडलान, विक्की करोलिया, अनिल मट्टू, संतोष सारसर, मंगेश मोकळ, सुरज जंगारे, नईम सरदार, अमोल छजलाने, धरीज कंडारे आदि उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्‍या दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. आपल्या आईसोबत तरुणी शेतात चारा गोळा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून, पाठीच्या कण्याचे हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगढच्या जेएन मेडिकल रुग्णालय व सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या पीडित तरुणीची प्राणज्योत माळवली. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता.

यापुढे जाऊन पोलिसांनी पीडितेचा मृतदेहावर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार केले. उत्तर प्रदेश पोलीसांनी आपली कामगिरी चोखपणे निभावली नसल्याचा व या घटनेचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकरणाचा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment