अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील तोफखाना येथील जंगूभाई तालीमच्या एका क्लबवर पोलिसांनी गुरूवारी रात्री छापा टाकला.
या छाप्यात सात जुगार्यांना अटक केली असून 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तही केला आहे.दरम्यान पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव मात्र पसार झाला आहे.
तोफखाना परिसरातील जंगूभाई तालीमच्या अडोशाला पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती खबर्याकडून पोलिसांना समजली.
एलसीबीच्या पथकाने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला, त्यावेळी जुगारी गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आले.
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन झुंबरलाल कोठारी (रा.शिरूर, पुणे), विनोद डॅनियल ससाणे (रा. सिध्दार्थनगर), गुलाब मौला शेख (आष्टी,बीड), शामसुंदर बारकू रोकडे (रा.तोफखाना),
संतोष अशोक कोठेकर (रा.सिव्हील हडको), रमेश गोपीनाथ मिसाळ (रा. हातमपुरा) आणि दत्तात्रय खुशालचंद गिरमे (रा.केडगाव) या सर्वाना अटक केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved