अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. लूट सुरू आहे. शेतकरी हितासाठी आरपारची लढावी लागेल. सत्ताधारी व विरोधक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
पुण्यातील साखर आयुक्तालयावर चला, सात-बारा कोरा व उसाला ४२०० रुपये भाव मिळून देतो, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यात सांगितले.

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे फक्त सत्तेसाठी शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून ते मिरवत आहेत, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी बोलताना केली. पाटील म्हणाले, काही जण कृषी कायद्याला विरोध करत आहे.
सध्या राज्यात राजकीय संघटनेच्या टोळ्या जमल्या आहेत. त्यापासून सावध रहायला पाहिजे. मोठ्या नेत्यांचा डोळा तालुक्यातील आकारी पडित जमिनावर आहे.
मात्र, या वडिलाेपार्जित हक्काच्या जमिनी आपण ताकदीनिशी मिळवू. अॅड. अजित काळे म्हणाले, केंद्राच्या शेतमाल नियमन मुक्ती उद्योग व्यापार कायद्यात त्रुटी आहेत. निर्यातबंदीप्रसंगी भाववाढ व युध्दजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे शंकास्पद वाटते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved