अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- एचआयव्ही संसर्गित रूग्णांच्या जीवनात प्रकाश ,उत्साह देण्याचे काम एआरटी केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग हे सातत्याने करत आहे.
या रूग्णांना दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे काम या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहे.समाजापासून दुरावलेला असा हा घटक आहे.नवी उत्साह,उमेद देण्याचे काम एआरटी केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाने केले आहे हे जिल्हा रुग्णालय व नगरकरांकरीता अभिमानास्पद आहे.
असे प्रतिपादन जिल्हा रूग्णालयाचे जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनी केले. एआरटी केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,
जिल्हा रुग्णालय अहमदनगरच्या वतीने एआरटी केंद्रात एचआयव्ही संसर्गित रूग्णांना दिवाळीनिमित्त रांगोळी व दिव्यांचे वाटप जिल्हा रूग्णालयाचे जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.सुनिल पोखरणा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ.महावीर कटारीया,
नोडल अधिकारी डॉ. आशिष कोकरे,एआरटीचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.सुनिल पोखरणा म्हणाले,कोरोना काळातही या विभागाने चांगले काम केले आहे.
या रूग्णांना या वस्तू देऊन त्यांच्या बेरंग जीवनात प्रकाशमय व रंग भरण्याचे काम केले आहे. डॉ. विक्रम पानसंबळ म्हणाले, एचआयव्ही संसर्गित रुग्णांना आपल्या प्रेमाची त्यांना माणूस म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याची गरज आहे
समाजाचे ॠण फेडणे हे आपले कर्तव्य मानून समाजकार्यात पुढाकार घेणारे अहमदनगरचे जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली एआरटी सेंटर व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सातत्याने काम करत आहे
या रुग्णांच्या जीवनात दीपोत्सवाच्या निमित्ताने नवा प्रकाश आणण्याच्या व त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्याचा संकल्प आम्ही केला आहे.सूत्रसंचालन भक्ती सामलेटटी यांनी केले.रणधीर भिसे आभार मानले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp