कोणते महत्त्वाचे दाखले तुम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळतात? किती लागतात त्यासाठी पैसे? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
gram panchyaat

ग्रामीण भाग म्हटले म्हणजे या भागाचा विकास हा प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार पाडला जातो. जर आपण पंचायत राज व्यवस्था पाहिली तर यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी ती एक रचना आहे. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात च्या योजना या जिल्हा परिषदेच्या मार्फत पंचायत समिती व त्याकडून ग्रामपंचायतीकडे येत असतात.

तसेच गावाच्या विकासाकरिता ग्राम पंचायत जो काही विविध कामांकरिता एक आर्थिक बजेट म्हणजेच अंदाजपत्रक तयार करते ते अंदाजपत्रक पंचायत समिती जिल्हा परिषद व राज्य सरकारकडे मंजुरी करिता पाठवत असते. अशा पद्धतीची ही एक रचना असते. ही झाली ग्रामपंचायतींचे गावाच्या विकासासाठी असलेली एक प्रक्रिया.

परंतु गावाचा एक नागरिक म्हणून तुम्हाला अनेक प्रकारची कागदपत्रे म्हणजेच दाखले देण्याची महत्त्वाची जबाबदारी देखील ग्रामपंचायतीची असते. यामध्ये अनेक प्रकारचे दाखले असतात जे आपल्याला ग्रामपंचायतीमधून प्राप्त होतात. यामुळे आपण या लेखांमध्ये ग्रामपंचायत मधून आपल्याला कोणकोणते दाखले मिळू शकतात व त्याकरिता किती शुल्क द्यावे लागते? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 ग्रामपंचायत मधून कोणते दाखले मिळतात?

यामध्ये जर आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 च्या कलम तीन प्रमाणे जर पाहिले तर ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना विविध प्रकारच्या दाखले किंवा सेवा दिल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने….

1- तुम्हाला जर जन्म नोंद दाखला हवा असेल तर तो ग्रामपंचायतीमधून मिळतो व त्याकरिता वीस रुपये शुल्क तुम्हाला द्यावे लागते.

2- तुम्हाला जर मृत्यू नोंद दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या मार्फत मिळतो व त्याकरिता वीस रुपये शुल्क लागते.

3- विवाह नोंद प्रमाणपत्र हवे असेल तर ते देखील तुम्हाला ग्रामपंचायतीमार्फत मिळते व त्याकरिता वीस रुपये शुल्क द्यावे लागते.

4- रहिवाशी  दाखला हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायतीमार्फत मिळतो व त्याकरिता वीस रुपये शुल्क लागते.

5- तुम्हाला जर दारिद्र्य रेषेखालील दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क म्हणजेच पैसे द्यावे लागत नाही.

6- तुम्हाला जर हयात असल्याचा दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता कुठल्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यायला लागत नाही.

7- तुम्हाला जर ग्रामपंचायत येणे बाकी दाखला हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायतीमधून मिळतो व त्याकरता तुम्हाला वीस रुपये शुल्क लागते.

8- शौचालयाचा दाखला तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता देखील तुम्हाला वीस रुपये शुल्क लागते.

9- तुम्हाला जर नमुना नंबर आठ उतारा हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायत देत असते व त्यासाठी वीस रुपये शुल्क द्यावे लागते.

10- तुम्हाला जर निराधार असल्याचा दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व तो मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज म्हणजेच पैसे द्यावे लागत नाही.

11- विधवा असल्याचा दाखला हवा असेल तर तो तुम्हाला ग्रामपंचायत देत असते व त्याकरता वीस रुपये शुल्क आकारते.

12- परीतेक्ता असल्याचा दाखला हवा असेल तर तो देखील तुम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळतो व त्याकरिता तुम्हाला वीस रुपये शुल्क आकारले जाते.

13- विभक्त कुटुंबाचा दाखला देखील ग्रामपंचायत देते व त्याकरता वीस रुपये शुल्क तुम्हाला द्यायला लागते.

यासंबंधी शासनाचा एक नियम असा आहे की ग्रामपंचायतींना दाखल्यांसाठी जे काही शुल्क आकारत असते त्यासंबंधीचा फलक ग्रामपंचायतीच्या दर्शनी म्हणजे समोरच्या भागात लावणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe