जिल्ह्यातील या तालुक्यात पावसाची विक्रमी नोंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे.

दरदिवशी पावसाचे वाढते प्रमाण पाहता नवनवीन विक्रम नोंदवले जात आहे. शेवगाव तालुक्यातील चापडगाव, बोधेगाव परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.

एका दिवसात चापडगाव मंडलात १७४ तर बोधेगाव परिसरात १५२ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे.

या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत वाया जाऊ लागलेले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे या पावसामुळे मोेठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून तर शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, शनिवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला होता.

ओढे, नाले, तळे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या पावसाने शेतकऱ्यांची मोठी दाणादाण उडाली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बाजरी, कापूस, तूर, कांदा पिके अतिपावसाने शेतातच सडली आहेत. या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment