अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नगर शहरातून जाणार्या रस्त्याचा प्रस्ताव मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे.
पूर्वीच्या नॅशनल हायवे 222 क्रमांकाचा असलेला व सध्या तो 61 क्रमांक असलेल्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. नेप्ती चौक ते सक्कर चौक असा हा रस्ता आहे.
2011 साली हा रस्ता नॅशनल हायवेमध्ये समाविष्ट करावा, असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गात या रस्त्याचा समावेश होतो. मात्र हा रस्ता शहरातून जाणारा असल्याने तो महामार्गात समाविष्ट केलेला नाही. नॅशनल हायवे अॅथोरिटीने या रस्त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविलेला आहे.
हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आणि त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी शिफारस करावी, अशी मागणी आ. जगताप यांनी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याकडे केली
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved