अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणात एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचा निवासी संपादक बाळ बोठे हा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाले आहे.
पत्रकार बोठे यानेच सुपारी देऊन रेखा जरे यांचे हत्याकांड केल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जरे हत्या प्रकरणात आता पर्यंत पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार झाला आहे. आरोपींनी सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे.
बाळ बोठे याचे जरे हत्याकांड प्रकरणात सूत्रधार म्हणून नाव पुढे आल्याने जिल्ह्यात माध्यम क्षेत्रात खळबळ माजली आहे.
दरम्यान बोठे याच्या घराची देखील झडती पोलिसांनी घेतली. त्या घरातून काही साहित्य जप्त करण्यात आले असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. बोठे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाले आहेत.
पत्रकार बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम चोळके याच्याकडून जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved