अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आजही दरदिवशी कोरोनाबाधित आढळून येत आहे. तसेच समूह संक्रमणामुळे याचा धोका वाढला आहे.
या भयावह परिस्थितीत शाळा, कॉलेज सुरु करू नये अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिल आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
या निवेदनात म्हंटले आहे कि, यंदाचे शैक्षणिक वर्ष 2020 – 21 आणि पुढील शैक्षणिक वर्ष 2021 – 22 ही दोन्ही एकत्रित करावीत. मुख्य सणांच्या सुट्ट्या वगळून अन्य सुट्ट्या कमी कराव्यात.
अभ्यासक्रम कुठेही कमी न करता तो पुढील काळात भरून काढण्यात यावा. तसेच डिसेंबर महिन्यात या महामारीवर लस उपलब्ध झाली तर जानेवारी पासून परिस्थितीनुसार शाळा, कॉलेज रीतसर सुरू करावीत.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वॅक्सिन देण्यात यावे. यामुळे कोरोनाचा धोका टळला जाईल. दरम्यान लस येण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, कॉलेज प्रत्यक्ष सुरू करू नयेत.
तोपर्यंत शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून वगळून फक्त वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved