शरद पवारांना जेव्हा राग येतो,पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवार संतापले…करायला लावले ‘हे’ कृत्य

Published on -

श्रीरामपूर :- नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असलेले शरद पवार यांचे आक्रमक रूप अहमदनगर करांना पाहायला मिळाले, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले होते, यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला.

नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर पवारांचा पारा चढला. चिडलेले पवार पत्रकारावर डाफरलेच, पण पत्रकार परिषदेतून उठून चालू लागले. मात्र, राग गिळून प्रश्नांना सामोरे गेले.

माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या संभाव्य पक्षांतरावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार संतापले. राजकारणात नातेगोते पाहात नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पवारांचे नातेवाईक असलेले उस्मानाबादमधील वजनदार नेते पद्मसिंह पाटील हेही भाजपच्या वाटेवर आहेत. याच अनुषंगानं श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला.

या प्रश्नामुळं शरद पवार भडकले. ‘इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं?, असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता?, तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले. त्यानंतर पवार पुन्हा बसले.

‘आपण गेलात तर बरं होईल,’ असंही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितलं. ‘किमान सभ्यता न पाळणाऱ्या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवायचं असेल तर मला बोलवू नका, असं त्यांनी उपस्थितांना सुनावलं.

त्यानंतर संबंधित पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्याची विनंती स्थानिक पत्रकारांनी केली. त्यानुसार, संबंधित पत्रकार बाहेर गेल्यावर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!