अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील 15 नंबर वार्डात चारही नगरसेवक शिवसेनेचे पण त्यांच्या वार्डातील विकास कामांचा नारळ फोडण्यासाठी भाजप नेते उपस्थित झाले आहेत.
या वार्डातील चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड आणि विद्या खैरे अशी शिवसेना नगरसेवकांची नावे आहेत.
याच वार्डातील काटवन खंडोबा रोडचे काम सुरू करण्यासाठी नारळ वाढविण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष अॅड अभय आगरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांच्याच हस्ते विकास कामाचा नारळ फोडण्यात आला . या कार्यक्रमात आगरकर यांनी शिवसेना नगरसेवक प्रभागातील विकास कामांत सक्रीय असल्याच्या शब्दात स्तुतीसुमनेही उधळली.
सर्व नगरसेवक प्रभागातील कामांबाबत सक्रिय आहेत. परंतु चांगले काम होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. त्यामुळे या रस्त्याच्या कामास उशीर झाला असला तरी आता हे काम मार्गी लागले असल्याने या रस्त्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे.
नागरिकांनीही आपल्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला पाहिजे, नगरसेवक ते सोडवतीलच, असा विश्वास माजी नगराध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved