अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम आहे. यामुळे राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नुकतीच ठाकरे सरकारच्या वतीने नियमावली जारी करण्यात आली यामध्ये काही गोष्टींना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मात्र मंदिरे बंदच ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.

यातच आता शिवसेना खासदार मंदिर उघडण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहे. शिर्डीतील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकतीच याबाबत बोलताना म्हणाले कि,
साईंच्या शिर्डीत बधितांची संख्या कमी प्रमाणात होत असल्याने तेथील मंदिर चालू करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली आहे.
कोरोना काळात बंद असलेली मंदिरे उघडण्या संदर्भात केवळ एका मंदिराचा नाही, तर संपूर्ण राज्याचा विचार मुख्यमंत्री ठाकरे करीत आहेत.
शिर्डीचे मंदिर खुले व्हावे ही माझीही भूमिका असल्याचे ते यावेळी म्हणाले. भाजपने मंदिर खुली करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरही लोखंडे यांनी टिकास्त्र सोडलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला हिंदुत्त्व सांगण्याची गरज नाही. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. ते सर्वांना माहिती आहे.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मुख्यमंत्री यांनी मंदिर बाबतचा निर्णय घेतला आहे.. त्यामध्ये राजकारण करू नये, असा सल्ला खा.लोखंडे यांनी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved