अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे अनेक महत्वाच्या कामकाजाबाबतच्या सभा या ऑनलाईन स्वरूपात पार पडत आहे. यातच जिल्हा परिषदेमध्ये आयोजित एका सभेदरम्यान झालेल्या गोंधळावरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेची आज ऑनलाईन सभा होती. आधी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. जे सदस्य प्रत्यक्ष सभेला येतील त्यांना सभागृहात बसू दिलं जाणार होतं.

मात्र प्रत्यक्ष सभा सुरु होण्याआधी ही सभा स्थायी समितीच्या छोट्या सभागृहात घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके तसेच अधिकारी स्थायी समितीच्या सभागृहात आले.
मात्र सभेचे ठिकाण ऐनवेळी का बदललं अशी विचारणा करीत विखेंसह भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. विखे यांनी स्थायी समिती सभागृहातच जमिनीवर बैठक मांडून सत्याग्रह सुरु केला.
सदस्यांनी मुख्य सभागृहाचे दार उघडण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. नंतर स्थायी समितीच्या सभागृहात हे सदस्य सभेसाठी गेले असता, त्यांनी तेथेही याचा जाब विचारत आंदोलन केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved