अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप. समवेत युवक कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, माऊली जाधव, जॉय लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जगताप म्हणाले की, राज्य महामार्गावरील रस्ते बांधकाम विभागाने लक्ष ठेवून चांगल्या दर्जाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करुन खड्डे बुजवावेत.
पुन्हा पुन्हा तेच काम करायची वेळ आणू नये. त्याच बरोबर महापालिका हद्दीतील खड्डे बुजविण्याचे कामही लवकरच सुरु होईल, असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved