अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, कॉलेज या अद्यापही बंदच आहे. शैक्षणिक वर्षात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले.
मात्र हेच शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील अकोले या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना काम करावे लागत आहे. समाजाला शिक्षणाच्या सोयी,
पुरवण्यासाठी राज्य सरकारने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी आश्रम शाळांची वस्तीगृहाची योजना सुरू केली आहे.
तसेच शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. म्हणून नामांकित शाळा शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. मात्र कोरोना संकटामुळे नियमित शाळा वस्तीग्रह बंद आहेत.
१ ऑगस्टपासून शहरातील बहुतेक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. मात्र आदिवासी समाजातील 90 टक्के पालकांकडे स्मार्ट फोन इंटरनेट नेटवर्क मोबाईल रिचार्ज करता रोख रक्कम नाही.
पाठ्यपुस्तके, नोटबुक, लाईटशिवाय घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही. अशा समस्यांमध्ये मार्च ते सप्टेंबर आदिवासी मुलांचा अभ्यास बुडाला आहे. गावाकडे गेलेली आदिवासी विद्यार्थी शेती व किरकोळ कामात पालकांना मदत करीत आहे.
त्यामुळे भविष्यात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊन शाळाबाह्य होण्याची भीती आहे. तर ही मुले रोजगार शोधण्यासाठी शहराकडे जाऊ लागल्याचे चित्र आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved