या ठिकाणची एमआयडीसी आठ दिवसांपासून पाण्याविना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

धरणांची पाणीपातळी वाढलेली असताना एक एमआयडीसी चक्क आठ दिवसांपासून पाण्याविना आहे. पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे.

त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. हा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी केली आहे.

याबाबत एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एन. जी. राठोड म्हणाले, पाणी पुरवठ्यासाठी वापरात असणारी जलवाहिनी निंबळक (ता. नगर) जवळ फुटल्याने हा ब्रेक डाउन असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करून शनिवारी संध्याकाळ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सुपा एमआयडीसीसाठी मुळा जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. खूप दूरवरून येणारी ही योजना आहे. त्यामुळे सुपा एमआयडीसीसाठी अजून एक पर्यायी पाणीपुरवठा योजना येथून जवळच असणाऱ्या विसापूर जलाशयातून राबवावी, अशी मागणी उद्योजक करत आहे.

एमआयडीसीतील पाणी बंद झाल्याने आम्हाला दररोज ९० हजार लिटर पाणी टँकरचे घ्यावे लागते.टँकरने जादा पैसे देऊन विकतचे पाणी घेऊन कारखान्यातील उत्पादन घेणे अवघड व कठीण झाले आहे. यामुळे तातडीने हि समस्या सोडविण्यात यावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment