या शिक्षकाचा संघर्ष ऐकून डोळ्यात येईल पाणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे पार करण्यासाठी हातभार लावणारे शिक्षक आपण सर्वानी पाहिले असतील.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शिक्षक हे मेहनत घेत असतात, मात्र आज एका शिक्षकाला स्वतःचा आर्थिक डोलारा रुळावर यावा यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे.

कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाऱ्या सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. कोतूळ येथील सुरेश देवराम गिते यांनी वीस वर्षापूर्वी एमएबीएड केले.

२००२ साली राजूर आदिवासी प्रकल्पात शासकीय आश्रमशाळेत साठ रुपये रोजंदारीने काम केले. शिक्षक म्हणून केळी कोतूळ येथील आश्रमशाळेत काम सुरू केले. नोकरी पुन्हा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचे उंबरे झिझवले.

नोकरीत कायम होऊ, या आशेवर अठरा वर्षे ते रोजंदारीवर काम करतात. त्यांनी राजूर प्रकल्पातील पाच शाळांत ज्ञानदानाचे काम केले. गिते याना उदरनिर्वाहासाठी गावात हॉटेल चालवतात.

दहा वर्षांपासून ते नोकरीत कायम होण्यासाठी न्यायालयीन लढा देत आहेत. त्यांच्याबरोबर तालुक्यातील चौदा तर राज्यातील पन्नास शिक्षक आश्रमशाळेत दहा ते पंधरा वर्षे रोजंदारीवर काम करतात.

रोजंदारी व हॉटेल चालवून सर्वोच्च न्यायालयात त्यांनी पाठपुरावा केला. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोकरीत कायम करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला तीन महिन्याच्या अवधीत कायम करून घेण्याचा आदेश दिला आहे. गेल्या वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा या गुरुजींना आतातरी न्याय मिळणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment