अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्याला लाभलेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची तडकाफडकी जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे.
त्यांची वादग्रस्त क्लिपची मोठी चर्चा झाली असून हि क्लिप सोशलवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. यामुळेच त्यांची बदली करण्यात आली असल्याच्या चर्चा सध्या पाथर्डी तालुक्यात सुरु आहे.
दरम्यान या क्लिप बाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप ही पूर्णपणे बनावट आहे.
मला अडकवण्याचे राजकीय षडयंत्र असून, जिल्ह्यातील एक मंत्री व एका आमदाराने त्यांचे अवैधधंदे वाचवण्यासाठी आमच्याच लोकांना हाताशी धरून खोटी क्लिप वायरल केली आहे.
त्या मंत्र्यांची व आमदाराची आपण लेखी तक्रार दोन दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकाकडे केली असल्याची प्रतिक्रिया तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी दिली आहे.
या प्रतिक्रियेमुळे राठोड यांनी पोलिस महासंचालक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत जिल्ह्यातील कोणता मंञी व आमदार आहे. याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असून ते मंञी,आमदार कोण याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved