अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे अद्याप जिल्ह्यातील शाळा तसेच कॉलेजबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे शिक्षणपद्धतीमध्ये अनेक बदल झालेला आहे.

यामुळे काही गोष्टी चांगल्या झाल्या आहेत तर शासनाच्या काही निर्णयांमुळे काही शिक्षकांचा रोजगार धोक्यात आला आहे. असे चित्रच सध्या दिसू लागले आहे.
नवीन संच मान्यतेमध्ये कलाध्यापक हे पद धोक्यात येत असून त्याचा मोठा फटका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कलाध्यापकांना बसणार असून शिक्षण आयुक्त यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आपल्या कलागुणांच्या विकासापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त होत आहे.
शासनाने हा निर्णय मागे घेऊन शाळा तिथे कलाध्यापक नेमावा व कलाध्यापकाचे पद अबाधित ठेवावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक काळे,व जिल्हा सचिव बाळासाहेब पाचरणे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुलांचे कलागुण ओळखून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम कला शिक्षक करीत असतो त्यामुळे सुधारित संच मान्यतेतील सोळा ते तेवीस शिक्षक पदे हा निकष रद्द करून पूर्वी प्रमाणेच संच मान्यतेत विशेष कला शिक्षकाचे पद अबाधित ठेवण्यात यावे अशी मागणी काळे व पाचरणे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved