अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोणताही संघर्ष हा कधीच सहज आणि सोपा नसतो. प्रत्येकाच्या संघर्षामागे एक मोठी गोष्ट असते. अशाच काही संघर्षाच्या आणि शून्यातून आपले एक नवीन विश्व तयार केलेल्या खास व्यक्तींच्या गोष्टी त्यांच्याचकडून ऐकण्याचा योग म्हणजे ब्रॅण्ड मेकर – किरण गवते आणि जे.पी मिडिया हब प्रस्तूत बंदे मे है दम हा कार्यक्रम आहे.
कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नकारात्मक भावनेने घेरलं, अनेकांना असंही वाटलं की इथून पुढे आपली नोकरी-धंदा याचं काय होणार? असे अनेक प्रश्न लोकांसमोर असल्याचं नगरमधील या ३ कलाकारांना जाणवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनेकदा चढ-उतार येत असतात.
मात्र त्यातून पुढे जाण्यासाठी प्रेरणा गरजेची असते. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या प्रसाद बेडेकर, किरण गवते आणि संकेत पावसे या तीन मित्रांनी लोकांना प्रेरणा मिळेल, असं काहीतरी द्यायचं ठरवलं. तीन मित्रांनी मिळून या कार्यक्रमाचा विचार करायला सुरुवात केली हा कार्यक्रम करत असताना
डोळ्यासमोर एकच लक्ष होतं ते म्हणजे लोकांना प्रेरणा मिळेल अशा त्यांच्यातल्या काही अप्रकाशित ताऱ्यांना लोकांसमोर आणणे. अखेरीस कार्यक्रमाची दिशा ठरली, मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
नगर जिल्ह्यातल्या तसेच पुणे जिल्ह्यातल्या काही नामवंत लोकांना आम्ही यात सहभागी करून घेऊ शकलो या सगळ्यांच्या कथा प्रत्येक दर्शकाच्या अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय राहत नाही. या प्रत्येकाच्या आयुष्यात कसे अडचणीचे प्रसंग आले, यांवर त्यांनी कशाप्रकारे मात केली त्यांच्या जगण्याचे सूत्र काय ठेवली ?
त्यांच्या आयुष्यावर नेमका कोणाचा प्रभाव पडला ? आणि त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व कसे निर्माण केलं ? हे त्यांच्याच शब्दात ऐकणे अत्यंत रोमांचकारी आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ब्रॅण्डमेकर किरण गवते यांची असून याचे निवेदन नगरमधील सुप्रसिद्ध निवेदक प्रसाद बेडेकर करतात.
यासाठी सिनेमा आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संकेत पावसे आणि सिने मालिका चे कार्यकारी निर्माता विराज मुनोत यांच विशेष सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण निर्मिती अहमदनगर मध्ये होते आहे आणि महाराष्ट्रातल्या एक नंबर मराठी चैनल असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर दर रविवारी हा कार्यक्रम प्रसारित होतो.
आजपर्यंत या कार्यक्रमाचे 8 एपिसोड प्रसारित झालेले आहेत. येत्या रविवारी दि 11 ऑक्टोबरला यामध्ये महाराष्ट्रातील आउटडोर मीडिया अर्थात होर्डिंग्ज क्षेत्रातील एक नामवंत नाव श्री आदेश चंगेडिया यांची मुलाखत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आपणही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊया, या कार्यक्रमाचे एपिसोड शेअर करूया, एकमेकांना प्रेरणा देऊया आणि प्रगतीची वाट चालूया…
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved