नदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह

Published on -

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  मुसळधार पावसाने हंगा नदीला आलेल्या पुरात सोमवारी संध्याकाळी मुंगशी येथील वाहून गेलेले ग्रामसेवक दत्तात्रय दिनकर थोरात (वय ५२) यांचा मृतदेह आज (ता. २२ ) सकाळी सात वाजणेच्या सुमारास तब्बल १२ तासांनतर आढळून आला. 

ज्या पुलावरून थोरात दुचाकीसह वाहून गेले तेथून सुमारे एक किलोमिटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी स्थानिक तरूणांच्या सहकार्याने पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली

त्यावेळी थोरात यांचा मृतदेह एका झुडपाला अडकलेला आढळून आला. काल पारनेर सह मुंगशी, लोणी हवेली व हंगे परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे हंगा नदीला अनेक वर्षानंतर मोठा पूर आला होता.

काल सायंकाळी थोरात हे हंगे येथून आपल्या दुचाकीवरून (एम.एच.१६ सी. आर.६३४९) घरी मुंगशी येथे सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास जात असताना त्यांना या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी आपली दुचाकी पाण्यात घातली.

ते पुलाच्या मध्यावर गेले असताना दुचाकीसह वाहून गेले. दुचाकी पुलाच्या जवळच झाडाच्या एका झुडपाला अडकली. मात्र थोरात दूर वाहात गेले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe