राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, ते आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

शाळा देखील टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

राज्यातील विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असून SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

काल सर्व राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली. सर्व विद्यापीठचे कुलगुरू विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत.

विद्यापीठं सुरू करत असताना SOP तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठ आणि राज्य शासन मिळून ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

वसतिगृह सुरू करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. कारण अजूनही काही वसतिगृह क्वॉरंटाईन सेंटर आहेत. ते सुद्धा टप्याटप्याने सुरू केली जाणार आहेत.

आता डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यानंतर तातडीने कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय होईल. कॉलेज सुरू होण्याची तारीख २ ते ४ दिवसात जाहीर करू, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment