अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- आमच्या पोटात दारू तर आम्ही काहीही करू… हि म्हण तुम्ही नक्की ऐकली असतील. मात्र अशाच एका दारुड्याने एक फोन करून प्रशासनाला कामाला लावले.
राहुरी कारखाना येथील एका नागरीकाने 108 नंबरवर कॉल करून मला कोरोना झाल्याचे खोटे सांगत प्रशासनाची धांदल उडवली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,

राहुरी कारखाना येथील आंबिकानगर भागातील एका दारुड्याने 108 नंबरवर कॉल केला व मला कोरोना झाल्याचे सांगितले. व लवकर मला दवाखान्यात घेऊन जा असे सांगुन रुग्णवाहिका बोलावली.
रुग्णवाहिनी त्या दारुड्याच्या घरी पोहचली. मात्र त्याला काहीही झालेलं नाही व तो दारुडा असून त्याचबरोबर तो मनोरुग्ण असल्याचे समजताच रुग्णवाहिकेचा चालक प्रचंड चिडला. मात्र दारुड्याच्या पत्नीने प्रशासनाची माफी मागितली.
ते मनोरुग्ण आहेत त्यांच्याकडून चुक झाली मी त्यांच्या वतीने माफी मागते. या गोष्टीवर पडदा टाकून रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका घेवून निघून गेला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved