अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- देशात कोरोनाची उतरण सुरु झाली तोच निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. आज देशभर बिहार निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे.
त्यातच नगर जिल्ह्यातील मुदत संपत आलेल्या नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. यातच अकोले नगरपंचायतच्या प्रभागनिहाय सोडत मंगळवारी (ता.10) सकाळी 11 वाजे दरम्यान

अकोले पंचायत समितीच्या सभागृहात प्रातांधिकारी डॉ.शशीकांत मंगरूळे, तहसीलदार मुकेश कांबळे व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
अकोले नगरपंचायत निवडणुकीत एकूण सतरा (17) प्रभाग आहेत. प्रभागनिहाय प्रभाग 1 ओबीसी (महिला), प्रभाग 2 सर्व साधारण, प्रभाग 3 सर्व साधारण, प्रभाग 4 ओबीसी (पुरूष), प्रभाग 5 सर्व साधारण,
प्रभाग 6 अनुसूचित जाती (महिला), प्रभाग 7 सर्व साधारण (महिला), प्रभाग 8 सर्व साधारण, प्रभाग 9 ओबीसी (महिला), प्रभाग 10 सर्व साधारण, प्रभाग 11 सर्व साधारण (महिला),
प्रभाग 12 सर्व साधारण (महिला), प्रभाग 13 ओबीसी (महिला), प्रभाग 14 ओबीसी (पुरुष), प्रभाग 15 सर्व साधारण, प्रभाग 16 अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग 17 सर्व साधारण (महिला) अशी आरक्षणाची सोडत निघाली आहे.
यावेळी संपत नाईकवाडी, प्रकाश नाईकवाडी, असीफ शेख, डॉ.रामहरी चौधरी, निखील जगताप, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,
नगरसेवक प्रमोद मंडलिक, रामनाथ शिंदे, योगेश नाईकवाडी, सुहास वाळुंज, अमित नाईकवाडी, गणेश कानवडे, परशराम शेळके आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved