अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन हात करून नव्हे, तर दोन हात जोडून सर्वसामान्य माणसांची मने जोडूनच सार्वजनिक जीवनात यश मिळवता येते. योग्य निर्णय, नशिबाची साथ, कार्यकर्त्यांचे श्रम व मतदारांचे अपार प्रेम ही आपली शिदोरी लाखमोलाची ठरली, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
हे पण वाचा :- वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार !
मोहटादेवी भक्त मंडळ, स्नेहबंध परिवार, लक्ष्मी नृसिंह प्रतिष्ठान, देवनाथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृहावर पत्रकार दिन व आमदार लंके यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
अध्यक्षस्थानी उद्योजक बाबासाहेब ढाकणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे रफिक शेख, दीपक काळे महाराज, पंचायत समितीचे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, गटनेते सुनील ओव्हळ, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक बंडू बोरुडे,
हे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !
राष्ट्रवादीचे सीताराम बोरुडे, मनसेचे संतोष जिरेसाळ, पं. स. सदस्य गोकूळ दौंड व सुभाष केकान, सेनेचे तालुकाध्यक्ष चितळे, सतीश मासाळकर, नामदेव लबडे, रणजित बेळगे, डॉ. सचिन गांधी, डॉ. श्रीधर देशमुख, नगरसेवक अनिल बोरुडे, नामदेव लबडे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार !
विविध संस्था व मित्र परिवाराच्या वतीने पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी लंके म्हणाले, एकेकाळी कार्यकर्ते पदरमोड करून प्रचार करायचे. कसलीही अपेक्षा नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. नेत्यांना लुटण्याची भावना वाढत चालली आहे. सर्वसामान्य माणूस, एवढेच नव्हे तर शाळकरी मुलांनी खाऊचे पैसे निवडणुकीसाठी दिले.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास
त्या प्रसंगाने आपण अधिक भावनिक झालो. कार्यकर्त्यांचे श्रम, मतदारांचे प्रेम याबरोबरच मोहटादेवीचे आशीर्वाद यश देतात. येत्या काळात कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.