प्राण्यांची शिकार करणारी ती बिबट्याची मादी अखेर जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे.

यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. नुकत्याच एका बिबट्या मादीने नेवासा तालुक्यात अक्षरश धुमाकूळ घातला होता. यामुळे ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली वावरत होते.

अखेर हा भक्षक बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री अडकला आहे. गेल्या महिन्यापासून राजेगाव, शिंगवेतुकाई व पांगरमल परीसरात रोजच बिबट्याचे दर्शन होत होते.

त्याने अनेक शेळ्या, मेंढ्या व कुत्रे फस्त केले आहे. बिबट्याच्या भितीने शेतीचे कामे ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने संबंधित परिसरात पिंजरा लावला होता.

अखेर सोमवारी (ता. १६) रात्री दहा वाजता तीन वर्षाची मादी पिंजर्यात ठेवलेल्या शेळीच्या आवाजाने आली. झेप घेतली आणि पिंजऱ्यात अडकली.

रात्री मादी बिबट्याला पाहण्यास बघ्यांची गर्दी जमा झाली होती. आज सकाळी बिबट्यास वैद्यकीय तपासणी व किरकोळ उपचारासाठी लोहगाव येथील नर्सरीत नेण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe