शेतमजुरीचे नियम आणि दर पत्रक ठरवणारे पहिले गाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजापुढे आता एक नवी समस्या उभी ठाकली आहे ती म्हणजे शेतीकामासाठी शेतमजूर मिळणे. हिच समस्या सोडविण्यासाठी टाकळीमियॉ येथील शेतकर्यांनी एक शकल लढविली परंतू यामधे शेतकरी अन् शेतमजुर यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतमजूर आणि त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न गंभीर बनत चालला अनेक ठिकाणी मजुरांच्या मनाप्रमाणेच कामाच्या वेळा ठरवाव्या लागतात. वेळप्रसंगी मागेल तेवढा मजुरीचा मोबदला आणि प्रवासासाठी वाहनही द्याव लागतात.

त्यावर उपाय म्हणून राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील शेतकन्यांनी एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र बैठक घेतली. आणि मजुरांचे रेटकार्ड बनवण्याचा निर्णय घेतला. आणि काही नियम बनवले आणि ग्रामसभा बोलवली परंतु हे नियम अमान्य करीत मजूरांनी मात्र ग्रामसभेकडे पाठ फिरवली

आणि ठरलेली ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली. सध्या भरमसाठ वाढलेल्या महागाईमुळे सभेत ठरलेलं दरपत्रक आम्हाला अजिबात मान्य नसल्याचं शेतमजूरांनी सांगितल आहे. शेतमजुरी काम कष्टाचे आहे. महागाई गगनाला भिडली आहे . दिवसभर राबून अपेक्षित मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतमजुरांची संख्या घटली आहे.

शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळाला. मात्र, मजुरांना त्याचा फायदा नाही. शेतमजुरी कामाचे दरपत्रक ठरवून, शेतमजुरांच्या श्रमाचे मोल कमी करण्याचा बड्या शेतकऱ्यांचा डाव आहे. श्रमाची किंमत कमी करणार नाही, अशी शेतमजुरांची भूमिका आहे. त्यामुळे शेतमजुर आणि शेतकरी यांच्यात काय तोडगा निघतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment