अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे अहमदनगरला आले होते.
आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरु असताना एक वाक्य ऐकून चक्क मंत्री विनोद तावडे हे चांगलेच घाबरले होते.

याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रा. राम शिंदे यांना हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सूत्रसंचालकाने बोलण्यासाठी आमंत्रित केले. मात्र, शिंदे यांच्याऐवजी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनीच उभे राहून सांगितले की,
‘शिंदे साहेबांचा घसा दुखत असल्यामुळे ते बोलणार नाहीत. जेव्हा तावडे हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम यावरच भाष्य केले.
ते म्हणाले, ‘जेव्हा भैय्या गंधे म्हणाले की शिंदे हे घसा दुखत असल्यामुळे बोलणार नाही, तेव्हा मी घाबरलो. कारण घसा दुखणे हे देखील एक कोरोनाचे लक्षण आहे.
मी लगेच शिंदे यांना विचारले, काय झाले, त्यावर शिंदे म्हणाले, संघचालक बोलल्यानंतर दुसरे कोणी बोलू नये, त्यामुळे मी बोललो नाही. त्यानंतर मात्र मी निर्धास्त झालो.
या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रा.राम शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे,
शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, अभय आगरकर आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved