कोरोनाने मृत झालेल्या ख्रिश्‍चन बांधवांचा अंत्यविधी समाजाला दिलेल्या दफनभूमीत व्हावा

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- कोरोना उपचारासाठी इतर ठिकाणाहून शहरात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचा शासकीय नियमानुसार अंत्यविधी शहरातील महापालिका हद्दीत करण्यात येत आहे.

मात्र अशा परिस्थितीमध्ये ख्रिश्‍चन बांधवाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना अडचण येऊ नये, यासाठी ख्रिश्‍चन समाजाला दिलेल्या दफनभूमीत त्याचा अंत्यविधी करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिले.

कोरोना महामारीमुळे शहरात उपचारादरम्यान यापूर्वी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण शहरात उपचारासाठी येतात.

मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्या रुग्णांचे अंत्यसंस्कार शासकीय नियमानुसार महापालिका हद्दीतच करणे बंधनकारक आहे.

अहमदनगर शहराच्या ख्रिश्‍चन समाजाची काही दफनभूमी असून, यामध्ये संबंधित व्यक्ती चर्च अथवा संस्थेचा सभासद असले तरच त्याचा दफनविधी केला जातो.

या कोरोनाच्या संकटकाळात जिल्हाभरातून ख्रिश्‍चनबांधव उपचारासाठी येत आहे. उपचारादरम्यान अशा एखाद्या ख्रिश्‍चन बांधवाचा मृत्यू झाल्यास तो चर्च व संस्थेचा सभासद नसल्याने त्यांच्या दफनविधीचा मोठा प्रश्‍न निर्माण होत आहे.

त्यामुळे ख्रिश्‍चन समाजासाठी नालेगाव येथील सर्व्हे नंबर दोनशे 221/1 ही दफनभूमी उपलब्ध आहे. या ठिकाणी कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांचा दफनविधी केल्यास मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अडचण येणार नसल्याचे निवेदनात आमदार जगताप यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment