अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून, पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे.

वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबली असून, ड्रेनेजच्या घाण पाण्याचे डबके साचले आहे.
या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तर अस्वच्छता, दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या नावाखाली मनपा सर्वसामान्यांच्या इतर आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून,
या भागात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना नव्हे तर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न अधिक घातक असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
ड्रेनेजलाईन दुरुस्त करण्यासाठी मनपा कर्मचारी येऊन गेले. मात्र मैलमिश्रीत पाणी उपसा करणार्या गाडीचा जेट दुरुस्त नसल्याने काही करता येत नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणने आहे.
केंव्हा हा जेट दुरुस्त होईल आणि केंव्हा हा प्रश्न मार्गी निघेल? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved