अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- आंदोलनामुळे जगात ख्याती असलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीची नेहमीच देशात चर्चा होत असते. आंदोलन असो वा काही अण्णांचे गाव म्हंटले कि चर्चेचा विषय झालाच.
मात्र याच अण्णांच्या गावात एक पारंपरिक खेळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो.
कोरोना संसर्गजन्य रोगाचे संकट असताना सामाजिक अंतर ठेवून राळेगणसिद्धी येथे परंपरागत चालत आलेला सोंगट्यांचा खेळ देवीसमोर खेळून भाविक देवीचा जागर करताना दिसत आहेत.
राळेगण येथील पद्मावती मातेच्या नवरात्र महोत्सवानिमित्त येथील गावातील ग्रामदैवताच्या मंदिरात पारंपरिक पध्दतीने सोंगट्याचा खेळ खेळला जात आहे.
हा खेळ खेळण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण एकत्र येत असून, गेल्या अनेक वर्षांची असलेली परंपरा यानिमित्ताने आजही गावकऱ्यांकडून जपली जात आहे.
उत्सव म्हणून अनेक वर्षापासून नवरात्र उत्सवात जागर व्हावा म्हणून करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा.
मात्र मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडेही पाठ फिरवली आहे. आजच्या तरुण पिढीने आधुनिक खेळाबरोबरच या खेळांकडे सुद्धा वळले पाहिजे. आपली परंपरा जपण्यासाठी तरुणांनी हा खेळ समजून घेऊन खेळला पाहिजे,
अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. वर्षातून एकदाच हा खेळ खेळत असल्याने या खेळाची आवड असलेले गावातील नागरिक मंदिरात दररोज हजेरी लावतात. कोरोनामुळे शासनाच्या नियमांचे पालन करूनच हा खेळ खेळाला जातो.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved