त्या तलावाला मिळाले लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटलांचे नाव

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारातून जाफराबाद येथे झालेल्या पाझर तलावाचे नामकरण “लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील पाझर तलाव’ असे करण्यात आले.

त्याचे उद्‌घाटन व जलपूजनाच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांनी सरकारला सादर केलेल्या आराखड्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली.

दुष्काळी पट्ट्याला न्याय देण्यासाठी गतीने पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे पाण्यासाठी केलेला संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला.

संघर्षाला न्याय मिळण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनेही दुष्काळी भागासाठी काही पावले टाकली पाहिजेत.” युती सरकारने गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्‍नासाठी 50 हजार कोटींचा आराखडा मंजूर केला होता.

त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने करावी, तसेच ग्रामीण विकासासह शेतकऱ्यांनीही स्वयंपूर्ण होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे, नानासाहेब शिंदे, दीपक पठारे, नितीन भागडे, सोन्याबापू शिंदे, गिरिधर आसने, गोरक्षनाथ ताके, गणेश मुदगले, सरपंच संदीप शेलार आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved