अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांसाठी सर्वात महत्वाची बातमी : आजपासून ‘हे’ असेल बंद !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारांना बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी दि. 26 मार्च रोजी हा आदेश काढला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गर्दी टाळणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 29 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.

मागील वर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्याच प्रमाणे यावर्षीही आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार यामूळे बंद राहणार आहेत.

आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

जिल्ह्यात गेल्या काही तासांमध्ये 829 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 239 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे. शहरात काेराेना संसर्गाची रुग्णसंख्या वाढतीच आहे. 

मागील चोवीस तासात 829 नवीन बाधिताची रूग्णसंख्येत भर पडली आहे. 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

नगर शहरातही रूग्णवाढीचा आलेख कायम आहे. आज मनपा हद्दीत नवीन 239 रूग्णांची भर पडली आहे. त्याखालोखाल कोपरगाव 89 आणि राहाता तालुक्यात 81 रूग्ण आढळून आले आहेत.

नगर ग्रामीणमध्येही रूग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असून चोवीस तासात 74 बाधितांची भर पडली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आरटीपीसीआर तपासणीत 205, खासगी लॅबमधील तपासणी 404 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 220 बाधित आढळून आले आहेत.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे :-  नगर मनपा – 239, कोपरगाव -89, राहाता-81, नगर ग्रामीण-74, श्रीरामपूर-55, नेवासा-52, पारनेर-48, संगमनेर-97, कर्जत-32, राहुरी-30, पाथर्डी-29, अकोले-27, बाहेर जिल्ह्यातील रूग्ण-11, श्रीगोंदा-10, कॅन्टान्मेंट बोर्ड-9, जामखेड-4, शेवगाव-2.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe