अहमदनगरमधील ‘त्या’ खुनांचे गूढ कायम; पोलीस परराज्यात गेले पण …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने धुमाकूळ घातला तसा पोलीस प्रशासनावरचा ताण वाढला. या कोरोनाच्या काळात जनता लॉक डाऊन होती. परंतु तरीही काही क्रिमिनल गोष्टी या काळातही घडल्या.

अहमदनगरमध्ये 6 मार्चला जेऊर बायजाबाई शिवारात शेतामध्ये मृत अवस्थेत तरुण तर 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात 35 ते 40 वर्षीय मृत महिला आढळून आली होती.

परंतु अद्यापही या खुनांचे गूढ कायम आहे. या दोन्ही मृत व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी व त्यांच्या मारेकर्‍यांचा तपास लावण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक झारखंड, उत्तराखंड राज्यात जाऊन आले.

परंतु त्यांना तेथूनही रिकाम्या हातानेच परतावे लागले. सदर महिला ही बंगाली असल्याने व तो तरुण हा एखाद्या ट्रकवरील ड्रायव्हर असल्याने पोलिसांनी परराज्यात तपाससाठी पथक पाठविले.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक झारखंड राज्यातील तीन ते चार जिल्ह्यांत जाऊन आले. तसेच उत्तराखंडमधील हरिद्वार येथेही हे पथक जाऊन आले.

परंतु, दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नसल्याने त्यांचे मारेकरी कोण? हा तपास करणे पोलिसांसमोर आवाहन आहे. तपासासाठी बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर त्याठिकाणचे स्थानिक लोक सहकार्य करत नाही.

यामुळे तपासकामात अडचणी येतात असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृत तरुण व महिलेच्या तपासकामी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक झारखंड, उत्तराखंडमध्ये पाठविले होते.

अजून मृत व्यक्तींची ओळख पटली नाही. तपास सुरू असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत अशी प्रतिक्रिया अजित पाटीत (उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण) यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment