अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ हजारांच्या पार गेली आहे. पूर्वीप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्यामध्ये होणारी वाढ हि आता काहीशी रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे.
नगरकरांसाठी एक दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.
दरम्यान कोरोनाबाधितांमध्ये अग्रेसर राहिलेला संगमेनर तालुक्यामध्ये आज 36 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरात ०३ तर ग्रामीण भागात ३३ रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाबाधितांची भर पडल्याने तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९४५ इतकी झाली आहे. शहरातील प्राप्त झालेल्या अहवालात ताजणेमळा येथे 46 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण,
शिवाजीनगर येथे 42 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. काही दिवसांपासून संगमेनर मध्ये शहरातील रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. मात्र तालुक्यातील गावपातळीवर काहीशी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved