जिल्ह्यातील या तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस मात्र निर्धास्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यात अनेक अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. यातच सध्या देशभर सुरु असलेल्या IPL ने सर्वाना वेड लावले आहे.

मात्र तालुक्यात आयपीएल वर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात आहे. यातून लाखों रुपयांची उलाढाल होत आहे. एकीकडे शहरासह तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरु आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त आहे.

दरम्यान IPL वर लावण्यात येत असलेल्या सट्ट्यांमुळे शेवगाव शहरात अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. सट्टेबाजीवर लाखो रुपयांची उलाढाल दररोज होते.

या अवैध धंदयाकडे मात्र अजूनही कारवाई झालेली नाही. शेवगाव तालुक्यात असा व्यवसाय करणारे ठराविक सट्टेबाज असून अशा अवैध धंदे चालकांकडून खुलेआम हा व्यवसाय चालवला जात आहे.

यामाध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र यामुळे तरुणाई गैर मार्गाला लागत आहे. दरम्यान अशा या अवैध धंद्यामुळे अवघ्या काही क्षणात हजारो रुपये मिळत असल्याने

अनेक तरुण या सट्टेबाजीकडे दलाल मित्राच्या माध्यमातून ओढले जातात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला. अनेक जण कर्जबाजारी व व्यसनाधीन झाले आहेत.

तरीही दिवसेंदिवस हा व्यवसाय अधिक जोमाने सुरु आहे. तडजोडीतून पैसा मिळवण्याचे एक हमखास माध्यम म्हणून पोलीस याकडे पाहत असल्यामुळे तरुण वर्ग मात्र कर्जबाजारी व व्यसनाधीन होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News