अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनासमोर डोकेदुखी उभी करत आहे. मात्र पोलीस प्रशासन देखील या आरोपीना पकडण्यासाठी त्यांच्यामागे हात धुवून लागले आहे.
नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश देवराम गायकवाड (वय 52 वर्षे, रा. भिंगाण ता. श्रीगोंदा) यास पोलिसांनी अटक केली आहे.

या आरोपीकडून पोलिसांनी दोन मोटारसायकल व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन मोबाईल असा सुमारे 5 लाख 56 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यात अनेक दिवसांपासून जबरी चोरी,
घरफोडी, दरोडा यासह विविध गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालता यावा यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागली होते.
आरोपी करत होता शेती पोलिसांना गुप्तरित्या समजलेल्या माहितीनुसार आरोपी सुरेश देवराम गायकवाड (रा. भिंगाण, ता. श्रीगोंदा) यास मूळ कामठी येथील राहणारा गायकवाड हा भानगाव येथील बापू गलांडे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच
अतिशय शिताफीने त्याला अटक त्याच्याकडून दोन मोटारसायकल, दोन मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved