अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात शाळा, महाविद्यालये बंदच ठेवण्यात आले आहे. दरम्यान शाळा दिवाळीनंतर उघडणार असल्याचे बोलले जात होते.
याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. शाळा सुरू होणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. पण दिवाळीपूर्वी राज्यातील शाळा सुरू होणार नाहीत.
तसेच दिवाळीनंतरही कोरोनाचा अंदाज घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
राज्य शासन व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू लागले.
हे लक्षात आल्यानंतर तेथील शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे राज्यात दिवाळीपूर्वी शाळा सुरू होणार नाहीत. दिवाळीनंतरही अंदाज घेतल्यानंतरच शाळा सुरू केल्या जातील.
कोरोनाची परिस्थिती सुधारत असली तरी ते त्याकडे दुर्लक्ष नको. तसेच येणारे नवरात्रही साधेपणाने करू. विनाकारण गर्दी करू नये, असा आवाहनही पवार यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved