…तर बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे.

मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते याबाबत उत्सुकता आहे.सत्तावाटपाचा सूत्रांकडून प्राप्त झालेला फॉर्म्युलाविचारात घेतला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेऊ शकते. तर काँग्रेस पक्ष सलग पाच वर्षे उममुख्यमंत्री पदावर राहू शकतो.
हे सूत्र प्रसारमाध्यमांतून झळकताच काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागू शकते याबाबत चर्चा सुरु झाली आहे.ह्यात बाळासाहेब थोरात हे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. थोरात हे उपमुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
राज्यात पहिल्यांदा दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांना तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना हे उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आठव्यांदा राज्याच्या विधानसभेत प्रवेश करण्याचा मान आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे जातो.२0१९ च्या निवडणुकीत विजय मिळवून थोरात हे संगमनेर मतदारसंघातून आठवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
यापूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या काळात थोरात यांनी महसूल, कृषिमंत्रीपद यशस्वीरित्या सांभाळले होते. त्यामुळे हायकमांड हे थोरात यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षात हायकमांड पशी असलेले वजन पाहाता त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित बोलले जात आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment