पुढील वर्षापासून पाचवीचे प्रवेश नाही; शासनाच्या खर्चात होणार बचत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. तसेच शाळा या दिवाळीनंतर सुरु होणार आहे.

दरम्यान मध्यन्तरी शालेय शिक्षणाबाबत काही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले आहे. यामुळे काही फेरबदल करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे करण्यात आलेल्या सरचनेप्रमाणे माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या पाचवीचा वर्ग पुढील वर्षापासून प्राथमिक शाळांना जोडण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत.

त्यामुळे राज्यात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर, सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर व नववी ते बारावी माध्यमिक स्तर अशी रचना स्वीकारण्यात आली आहे.

मात्र राज्यात यापूर्वी माध्यमिक शाळांना मान्यता देताना पाचवी ते दहावी आठवी ते दहावी अशी देण्यात आलेली आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्राथमिकला मान्यता देताना पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अशी देण्यात येत आहेत. राज्यात मात्र कायद्याप्रमाणे शाळांच्या संरचनेत बदल करण्याची आवश्यकता असल्याने

माध्यमिक शाळांना जोडून असलेले पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चौथीपर्यंतच्या शाळांना किंवा खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांना एक किलोमीटरच्या आत पाचवीचा वर्ग उपलब्ध होणार आहेत.

तसेच केवळ आठवी ते बारावी मान्यता असलेल्या शाळांचा आठवीचा वर्ग ही सातवीपर्यंत असलेल्या शाळेत जोडण्यात येणार आहे. शिक्षकांचे होणार समायोजन शासनाच्या नवीन आदेशामुळे खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील वर्ग बंद होणार असल्यामुळे शिक्षक अतिरिक्त होणार असले,

तरी संबंधित शिक्षकांचे समायोजन त्याच संस्थेत करण्यात यावे .तेथे जागा नसल्यास दुसर्‍या खाजगी संस्थेत करण्यात यावे आणि दुसर्‍या संस्थेत जागा नसेल तरच स्थानिक स्वराज्य संस्थेत सामावून घेण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment