अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासुन जगभर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे.
तसेच या कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षणविभागात अनेक बदल करण्यात आले. असाच एक बदल नुकताच करण्यात आला आहे. करोना पार्श्वभूमीवरती शिक्षक होण्यासाठीच्या डी.टी.एड प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
तर द्वितीय वर्षाच्या संदर्भाने परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. द्वितीय वर्षाच्या परीक्षा 20 जानेवारीपासून नियोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा प्रत्यक्ष होणार असून ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
जाणून घ्या परीक्षेचे वेळापत्रक
- 20 जानेवारी – भारतीय समाज आणि शिक्षण,
- 21 जानेवारी – शालेय संस्कृती व्यवस्थापन नेतृत्व परिवर्तन
- 22 जानेवारी – शिक्षणातील नवीन विचार प्रवाह
- 23 जानेवारी – इंग्रजी भाषा संप्रेषण व प्रभुत्व मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व
- 25 जानेवारी – द्वितीय भाषा अध्ययन अध्यापन शास्त्र
- 27 जानेवारी – इंग्रजी अध्ययन अध्यापन शास्त्र
- 28 जानेवारी – विज्ञान व गणित अध्ययन अध्यापन शास्त्र
- 29 जानेवारी – सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved