अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे

महाशिवआघाडी सत्तेत येण्याचे संकेत मिळताच राज्यातील राजकीय समीकरणेही वेगाने बदलू लागली आहेत.

नगर जिल्ह्यातुन तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात, रोहीत पवार, संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याच्या मंत्रीमंडळातील जबाबदारी दिसू शकते.

आमदार गडाख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ६ आमदार निवडून आले असताना त्यातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार व दुसर्यांदा निवडून आलेले अनुभवी असलेले नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते.

जिल्ह्यावर असणारे विखे पाटलांचे प्रभुत्व मोडीत काढण्याची खेळी आता पुढील काळात राष्ट्रवादी खेळू शकते. त्यासाठी मंत्रीमंडळात सहभागी होताना मोठा खल होऊन जिल्ह्याची जबाबदारी सहापैकी कोणावर येते हे पाहावे लागणार आहे.
- आठवडाभरातील घसरणीनंतरही ब्रोकरेज हाऊसेसचा ‘Buy’ वर भर; बँकिंगपासून कंझ्युमर सेक्टरपर्यंत निवडक शेअर्सवर विश्वास कायम
- सोनं-चांदीच्या दरांनी मोडले सगळे विक्रम! अवघ्या काही दिवसांत प्रचंड दरवाढ; कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
- TET निकालानंतर शिक्षकांना मोठा दिलासा; प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न सुटला, शेकडो जणांना लाभ
- सावधान! रेशनचे धान्य कायमचे बंद होणार? २.५ लाख लाभार्थ्यांवर टांगती तलवार; नाव वाचवण्यासाठी तातडीने ‘हे’ काम करा
- रब्बी हंगामाच्या तोंडावर हरभरा-तूर बाजारात विरोधाभास; हरभऱ्याचे दर घसरले, तुरीला अचानक तेजी













