अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिन्यांपासून बंद असलेले जगप्रसिद्ध नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील मंदिर उघडणार आहे. कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेले शनिदर्शन सोमवारी सुरू झाले आहे.
सुरक्षित अंतर ठेवून रोज फक्त सहा हजार भाविकांना शनिदर्शन दिले जाणार आहे. स्वयंभू शनिमूर्तीपर्यंत पूजा साहित्य नेण्यास भाविकांना परवानगी नसून, फक्त तेलच नेता येणार आहे.
प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस मंदिरे खुली झाली आहे. यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने थाटण्यास सुरु वाट केली आहे.
या नियमांचे पालन करणे बंधनकारक पाच वर्षाखालील मुले व 65 वर्षांपुढील ज्येष्ठांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. रोज सहा हजार भाविकांनाच दर्शन दिले जाणार आहे. स्वयंभू शनिमूर्तीपर्यंत फक्त तेल नेण्यास परवानगी आहे.
श्रीफळ, रूईचा हार, काळे कापड, तसेच सर्व पूजासाहित्य महाद्वारातच काढून घेण्यात येणार आहे. पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था नाही. हातपाय धुणे, प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरची सोय केली जाणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved