हा महाराष्ट्र सरकारचा निर्लज्जपणा, सर्वसामान्य जनतेची फसवणूक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- वीज बिलांबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात वाढीव व चुकीच्या वीज बिलामध्ये सवलत देऊ असं खोटं बोलणाऱ्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता वीज बिलामध्ये सवलत देता येणार नाही असे स्पष्ट करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे.

त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आगामी अधिवेशनात विधानसभेमध्ये हक्कभंग आणणार असल्याचे बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. वाढीव आणि चुकीच्या वीज बिलांच्या विरोधात भाजपने आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत

यांनी जाहीर केले होते तसा प्रस्ताव तयार झाल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले होते. यानंतर वीज बिलामध्ये सवलत मिळेल असं सांगणाऱ्या ऊर्जामंत्री यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही असे आता स्पष्ट केले असून हा महाराष्ट्र सरकारचा निर्लज्जपणा असल्याची घणाघाती टीकाही बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment